Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवेत नियमित तत्वावर प्रधान संचालकांची 7 पदे आणि संचालकाच्या 36 पदांच्या निर्मितीला मंत्रिमंडळाची मान्यता


संरक्षण मंत्रालयाच्या, सशस्त्र दल मुख्यालय नागरी सेवेच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून, नियमित तत्वावर प्रधान संचालकांची 7 पदे आणि संचालकाच्या 36 पदांच्या निर्मितीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

नियमित पदाच्या निर्मितीमुळे केडरमधली साचलेपणाची स्थिती समाप्त होणार आहे. यामुळे उत्तम संवर्ग व्यवस्थापन शक्य होणार असून, सेवेच्या क्षमतेत अधिक सुधारणा होणार आहे. या कल्पक उपायामुळे कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही.

N.Sapre/N.Chitale/D.Rane