पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सशस्त्र सीमा दलाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना केंद्रीय गट “अ” सेवा आणि संवर्ग प्रदान करायला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत सहाय्यक कमांडंट ते महानिरीक्षक पदापर्यंतच्या विविध 19 पदांच्या निर्मितीसंबंधी गट “अ” वर्गाच्या अधिकाऱ्यांची समीक्षा समाविष्ट आहे, जेणेकरून सशस्त्र सीमा दलाच्या परिचालन आणि प्रशासनिक क्षमतेत वाढ होईल.
सध्याच्या गट “अ” पदांची संख्या 1253 वरून 1272 करण्यात आली असून तिचा तपशील पुढीलप्रमाणे:
1. महानिरीक्षक (एसएजी स्तर )पदांमध्ये 2 ने वाढ
२. उपमहानिरीक्षक /कमांडंट (जेएजी ) 2 पदांची वाढ
३. उपकमांडंट (एसटीएस स्तर) 2 पदांची वाढ
४. सहाय्यक कमांडंट (जेटीएस स्तर ) 4 पदांची वाढ
A.Sharma/S.Tupe/S.Kane/Anagha