पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सहकारी बँकांकडून अल्पकाळासाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2016 या दोन महिन्यांचे व्याज माफ करायला कार्योत्तर मंजुरी दिली. नाबार्डने सहकारी बँकांना अतिरिक्त पुन:अर्थसहाय्य पुरवल्यास नाबार्डला व्याजावर अनुदान देण्याची तरतूद या निर्णयात आहे.
सहकारी बँकांकडून अल्प काळासाठी पीक कर्ज घेतलेल्या देशभरातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. रब्बी पिकांसाठी सहकारी बँकांकडून सहज कर्ज घेता यावे हा यामागील उद्देश आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर 2016 या दोन महिन्यांची व्याजमाफी म्हणून सहकारी बँकांना नाबार्डकडून अतिरिक्त निधी दिला जाणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त 1060.50 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. 2016-17 वर्षासाठी व्याजमाफी योजना राबवण्यासाठी राखून ठेवलेले 15 हजार कोटी रुपये यापूर्वीच वापरण्यात आले आहेत.
B.Gokhale/S.Kane/P.Kor