Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सह्योगासाठीच्या भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी


भारताचा आर्थिक कार्य विभाग आणि ऑस्ट्रेलियाचा कोषागार विभाग यांच्यात सहयोगाच्या अनुषंगाने   तीन महिन्यांच्या कालावधीसाठी झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्री मंडळाने मान्यता दिली आहे.

 

या अंतर्गत ऑस्ट्रेलियन कोषागाराचा एक अधिकारी, भारतीय  आर्थिक कार्य  विभागात तर भारतीय आर्थिक कार्य विभागाचा एक अधिकारी ऑस्ट्रेलियाच्या कोषागारात स्थानांतरीत केला जाईल. 15 जानेवारी 2018 किवा त्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हे स्थानांतरण राहील.  या कालावधीनंतर या कराराची मुदत वाढवता येणार नाही.

 

महत्वाचा परिणाम

ऑस्ट्रेलिया हा भारताचा एक महत्वाचा द्विपक्षीय  भागीदार आहे. या प्रस्तावित कार्यक्रमामुळे दोन्ही देशांची सध्याची आर्थिक धोरणे समजून घ्यायला आणि परस्पर सहयोगाच्या आणखी संधी शोधायला मदत होणार आहे.

BG/NC