Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

साखरेच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यांना साठेबाजीवर मर्यादा लादण्याचे अधिकार द्यायला सरकारची मंजुरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंदीय मंत्रिमंडळाने साखरेच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यांना साखरेच्या साठ्याची मर्यादा निश्चित करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

साखर कारखान्यांकडे साखरेचा पुरेसा साठा असूनही घाऊक आणि किरकोळ किंमतीत वाढ होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे.

सरकारने साखरेचा उपलब्ध साठा आणि देशभरात साखरेच्या किंमती वाढण्यास कारणीभूत ठरणाऱ्या विविध बाबींची माहिती घेतली. मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे राज्य आणि केंद्रीय संस्थांना साखरेच्या साठ्याची मर्यादा निश्चित करण्याचा अधिकार मिळेल आणि साखरेचा पुरवठा, साठा आणि व्यापार नियमित होऊन साखरेच्या किंमतीवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

S. Kane /B. Gokhale