पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि प्रादेशिक विकास कार्यक्रम क्षेत्रात नीति आयोग आणि रशियन महासंघाच्या आर्थिक विकास मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला मंजुरी दिली.
सामाजिक, आर्थिक, औद्योगिक आणि प्रादेशिक विकास कार्यक्रमाची आणि धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी सहकार्याच्या संधींचा शोध घेणे हा या कराराचा उद्देश आहे. परस्परांचे सामर्थ्य, बाजार, तंत्रज्ञान, धोरणे आदी जाणून घेण्यासाठी अनुकूल वातावरण आणि चौकट उपलब्ध करून देण्याची तरतूद यात आहे.
सामंजस्य करारात पुढील क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे:
(i) परस्पर हिताशी संबंधित संयुक्त शोध प्रकल्प चालवणे
(ii) परस्पर हिताच्या मुद्द्यांशी संबंधित सरकारी धोरणे आणि विकास कार्यक्रमाबाबत माहिती आणि शोधकार्याचे आदान-प्रदान
(iii) संयुक्त आयोजनात सहभागी होण्यासाठी दोन्ही देशाच्या तज्ञांचे दौरे
(iv) दोन्ही देशांच्या सहमतीच्या कार्यक्रमांवर चर्चासत्रे, परिषदा आणि बैठकांचे आयोजन
(v) दोन्ही देशांच्या परस्पर सहमतीनुसार सहकार्याचे अन्य मार्ग
N.Sapre/S.Kane/P.Malandkar