पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाला भारत आणि फिनलॅण्डदरम्यान सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यावरील सामंजस्य कराराबाबत अवगत करण्यात आले.
भारत आणि फिनलॅण्डदरम्यान माहितीची देवाणघेवाण तसेच सुरक्षेशी संबंधित घटनांचा शोध आणि प्रतिबंध यासाठी सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे.
जानेवारी 2019 मध्ये या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.
B.Gokhale/S.Kane/P.Kor