Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सायबर सुरक्षेसंदर्भात भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि मलेशिया, सिंगापूर आणि जपानमधल्या संबंधित संस्था यांच्यातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या


सायबर सुरक्षेबाबत भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम सी ई आर टी-इन आणि मलेशिया, सिंगापूर आणि जपानमधल्या संबंधित संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराची केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत माहिती देण्यात आली.

सायबर सुरक्षेसंदर्भात सहकार्य करण्याबाबतच्या तीन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याचा तपशील याप्रमाणे-

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मलेशिया दौऱ्यात 23 नोव्हेंबर 2015 मध्ये सायबर सुरक्षेसंदर्भात सी ई आर टी-इन आणि सायबर सिक्युरिटी मलेशिया यांच्यात सामंजस्य करार झाला.

2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंगापूर दौऱ्यात 24 नोव्हेंबर 2015 ला सायबर सुरक्षेबाबत सी ई आर टी-इन आणि सिंगापूर काम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सायबर सुरक्षा एजन्सी सिंगापूर यांच्यात सामंजस्य करार झाला.

3. सी ई आर टी-इन आणि जपान काम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम को-ऑर्डिनेशन सेंटर यांच्यात 7 डिसेंबर 2015 ला सायबर सुरक्षेबाबत सामंजस्य करार झाला. स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराचे आदान-प्रदान 22 डिसेंबर 2015 ला पूर्ण झाले.

या सामंजस्य करारांमुळे भारत आणि संबंधित देश यांच्यात सायबर सुरक्षेसंदर्भातल्या घटनांचा तपास, अशा घटना रोखणे याबाबत ज्ञान आणि अनुभवांच्या आदान-प्रदानाला चालना मिळून सहकार्य अधिक दृढ व्हायला मदत होईल.

N.Chitle/S.Tupe/M.Desai