पीएम्इंडिया
सार्वजनिक उपक्रम निवड मंडळ (पीईएसबी)च्या 3 मार्च 1987 च्या प्रस्तावातल्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज पूर्वलक्षी प्रभावाने संमती दिली. प्रस्तावित सुधारणा याप्रमाणे आहेत :-
1. केंद्रीय सार्वजनिक उद्योगांमध्ये पाच वर्षांच्या नियुक्तीत बिगर अंतर्गत उमेदवार म्हणून राज्य लोक उपक्रम आणि खाजगी क्षेत्रातल्या उमेदवारांची निवड
2. पीईएसबीचे अध्यक्ष आणि सदस्य म्हणून पदभार स्विकारल्यापासून तीन वर्षांचा कार्यकाळ अथवा 65 वर्षे पूर्ण अथवा पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत यापैकी जे प्रथम होईल तोपर्यंत त्यांना पदावर राहता येईल.
N.Chitale/B.Gokhale