पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचा एक माहितीपूर्ण लेख सामायिक केला. गोयल यांच्या लेखात गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेसच्या (GeM) आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे. या लेखात त्यांनी पारदर्शक खरेदी, व्यापक सहभाग आणि उत्तम संधी यावर प्रकाश टाकला आहे. GeM सार्वजनिक खरेदी व्यवस्थेत अशाप्रकारे परिवर्तन घडवत आहे, असेही त्यांनी लिहिले आहे.
तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून, GeM व्यासपीठाने गेल्या दहा वर्षात अधिक स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करून ‘व्यवसाय सुलभता’ अधिक मजबूत केली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि महिला उद्योजकांना यामुळे मोठ्या प्रमाणात सक्षम बनवले जात असल्याचे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये लिहिले:
“पारदर्शक खरेदी, व्यापक सहभाग आणि उत्तम संधी… अशा प्रकारे @GeM_India सार्वजनिक खरेदीमध्ये परिवर्तन घडवत आहे.
तंत्रज्ञानाला केंद्रस्थानी ठेवून, GeM व्यासपीठाने गेल्या 10 वर्षांत अधिक स्पर्धात्मक आणि सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करून, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि महिला उद्योजकांना सक्षम करून, व्यवसाय सुलभता अधिक मजबूत केली आहे.
आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री श्री @PiyushGoyal यांचा हा माहितीपूर्ण लेख वाचा.”
Transparent procurement, wider participation and better opportunities… This is how @GeM_India is transforming public procurement.
With technology at its core, the GeM platform has strengthened Ease of Doing Business over the last 10 years by creating a more competitive and… https://t.co/Z9rQLnGUXp
— PMO India (@PMOIndia) August 11, 2026
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Transparent procurement, wider participation and better opportunities... This is how @GeM_India is transforming public procurement.
— PMO India (@PMOIndia) August 11, 2026
With technology at its core, the GeM platform has strengthened Ease of Doing Business over the last 10 years by creating a more competitive and… https://t.co/Z9rQLnGUXp