पीएम्इंडिया

सिंगापूरचे उप पंतप्रधान थर्मन षण्मुगरत्नम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली.
सिंगापूरचे पंतप्रधान ली लूंग यांनी 2016 च्या ऑक्टोबरमध्ये भारताला दिलेल्या यशस्वी भेटीचे स्मरण, पंतप्रधानांनी केले.या वेळी घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही बाजूनी केलेल्या कार्यवाहीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
वस्तू आणि सेवा कर यशस्वीरित्या लागू केल्याबद्दल षण्मुगरत्नम यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले. द्विपक्षीय संबंध, विशेषतः आर्थिक क्षेत्रातल्या द्विपक्षीय संबंधातल्या प्रगतीबद्दल त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
गुंतवणूक,नागरी विकास,कौशल्य विकास,हवाई वाहतूक यासारख्या क्षेत्रात घनिष्ठ द्विपक्षीय सहकार्याची, पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
बँकिंग,पर्यटन,नाविन्यता,डिजिटल फायनान्स या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्याला असलेला वाव, याबाबतही उभय नेत्यांनी चर्चा केली.
BG/NC
Had a wonderful meeting with Mr. Tharman Shanmugaratnam, Deputy Prime Minister of Singapore. pic.twitter.com/PeIWaxSyCs
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2017