Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सुरत मॅरेथॉनच्या उदघाटन सोहळ्यात पंतप्रधानांनी दिलेल्या भाषाणातील ठळक मुद्दे

जेव्हा लोक काहीतरी करण्याचा निर्णय घेतात तेव्हा कोणतीही शक्ती त्यांना रोखू शकत नाही. ही लोकांची ताकद आहे. कोणताही देश नेते किंवा सरकारमुळे बनत नाही तर लोकांची ताकद देशाला घडविण्याचे कार्य करते.

आम्हाला एक नवीन भारत तयार करायचा आहे, जो जात, सांप्रदायिकता आणि भ्रष्टाचार यांच्या राजकारणापासून मुक्त आहे. आम्हाला भारत निर्माण करायचा आहे जिथे प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.

सुरत शहर एका विशिष्ट संकल्पाने प्रेरित झाले आहे. हे एक असे शहर आहे जे सुसंवादावर , मानवतेवर विश्वास ठेवते. मी सूरतच्या नागरिकांना विनंती करतो की, त्यांनी यावर्षीच्या जूनमध्ये योगा दिनामध्ये सक्रिय सहभागी व्हावे. तसेच ऑक्टोबर मध्ये ‘रन फॉर युनिटी’ या कार्यक्रमातही सहभागी व्हावे.

अश्या मॅरेथॉनची आयोजन लोकांच्या आरोग्यासाठी चांगले असते. मी लोकांना आवाहन करतो की लोकांनी क्रीड़ा भावना जोपासवी यामुळे चांगले आरोग्य मिळते आणि एकीकरणाची भावना वाढीस लागते.

नविन भारत निर्मिति हे आमचे अभियान आहे. स्वातंत्र्य लढ्यात ज्या स्त्री -पुरुषांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम श्रद्धांजली आहे.

B.Gokhale