Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पाठबळ देणाऱ्या पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुर


सूक्ष्म आणि लघु उद्योगांना पाठबळ देणाऱ्या पॅकेजला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्योत्तर मंजुरी देण्यात आली.

पॅकेजची वैशिष्ट्ये : –

I) सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठीच्या पत हमी ट्रस्टच्या निधीत 2,500 कोटी रुपयांवरुन, 7,500 कोटी रुपयांची वाढ, भारत सरकारकडून निधी पुरस्कृत

II) पत हमी योजनेंतर्गत कर्ज लाभात एक कोटी रुपयांवरुन दोन कोटी रुपयांची वाढ

III) एनबीएफसीकडून सूक्ष्म आणि लघु उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जांचाही पत हमी योजनेत समावेश. यामुळे ट्रस्टचा आवाका वाढेल.

फायदे

• पत पातळी कमी होणे

• निधीची शाश्वतता सुधारणे

• अधिकाधिक सूक्ष्म व लघु उद्योगांना पत हमी पुरवण्यासाठी ट्रस्टला सक्षम करणे

• वित्तीय व्यवस्थापन सुधारणे

• अदेय निधीचे अस्थायी दायित्व मर्यादित ठेवणे

निधीत वाढ झाल्यामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या पत निधी सुविधेत वाढ होईल. यामुळे उत्पादनात व रोजगारात वाढ होऊन सर्वसमावेषकतेला चालना मिळेल. यामुळे स्टार्टअप्सना चालना मिळणार असून प्रत्येक व्यवहार ऑनलाईन असल्यामुळे यंत्रणेत सार्वजनिक उत्तरदायित्व असेल.

B.Gokhale/S.Kulkarni/P.Malandkar