Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीला पंतप्रधानांची उपस्थिती

सोमनाथ ट्रस्टच्या बैठकीला पंतप्रधानांची उपस्थिती


श्री केशुभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत सोमनाथ ट्रस्टची बैठक आयोजित करण्यात आली. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, श्री लालकृष्ण अडवाणी, श्री हर्षवर्धन नेवतीया आणि श्री पी.के.लाहेरी हे मान्यवर विश्वस्त म्हणून बैठकीला उपस्थित होते.

2016 या वर्षासाठी केशुभाई पटेल यांचीच ट्रस्टच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली तर दिवंगत प्रसनवदन मेहता यांच्या जागी विश्वस्त म्हणून श्री अमित शाह यांची नियुक्ती झाली. श्री राजन किलाचंद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सोमनाथ मंदिराला मुख्य धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. वैशिष्ट्यपूर्ण वास्तविक वस्तुसंग्रहालय आणि सभागृहाचे बांधकाम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. यासंदर्भात सोमनाथ, दिव आणि गीर सिंह सफारी असे पर्यटन मंडल निर्माण करण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. याशिवाय आणखी पर्यटन आकर्षणांचा समावेश करण्याचा निर्णयही ट्रस्टने घेतला.

M. Pange/S.Tupe/M.Desai