Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सौदी अरेबियाचे राजा किंग अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त


सौदी अरेबियाचे राजा अब्दुल्ला यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या देशावर आगळावेगळा ठसा उमटवलेल्या एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वाला आपण गमावले आहे. अब्दुल्ला यांच्या निधनामुळे सौदी अरेबियाने मार्गदर्शक गमावला असून तेथील जनतेच्या दु:खात आपण सहभागी आहोत.

काही दिवसांपूर्वीच आपण क्राऊन प्रिंस सलमान यांच्याकडे राजा अब्दुल्ला यांच्या आरोग्याची विचारपूस केली होती. राजा अब्दुल्ला यांचे निधन ही दु:खद बातमी आहे. अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.