Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

सौदी अरेबियाच्या पर्यावरण, जल आणि कृषी मंत्र्यांची पंतप्रधानांनी घेतली भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचे पर्यावरण, जल आणि कृषी मंत्री अब्दुलरहमान अल फदली यांची भेट घेतली. पर्यावरण, जल आणि कृषी क्षेत्रात सहकार्याला भरपूर वाव असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आपले पर्यावरण उत्तम राखणे आणि जलसंसाधनांच्या प्रभावी उपयोगासाठी एकत्रित काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor