Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्कॅटसॅट-एक उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केले इस्रोचे अभिनंदन


अत्याधुनिक हवामान उपग्रह स्कॅटसॅट वन आणि इतर उपग्रहांच्‍या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोच्या अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

“हा क्षण भारतासाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा आहे. पीएसएलव्हीसी 35/स्कॅटसॅट-एक आणि इतर सात उपग्रहांच्‍या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अभिंनदन.
आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांकडून इतिहास रचणे सुरुच आहे. त्यांची नाविन्यपूर्ण उपक्रमाविषयीची आस्था सव्वाशे कोटी भारतीयांना स्पर्शुन गेली आहे आणि त्यांनी जगात भारताची मान उंचावली आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Kulkarni/Anagha