Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्टॅच्यु ऑफ युनिटी उभारल्याबद्दल माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा


गुजरातमधे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांनी प्रशंसा केली आहे. अहमदाबाद विमानतळाचे नांव सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले आहे आणि नादियाड या त्यांच्या मूळ गावी सरदार वल्लभभाई पटेल स्मृती स्थळ याआधीच निर्माण करण्यात आले आहे याचे स्मरण देवेगौडा यांनी केले आहे. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्यात आला आहे. हे स्थान आकर्षक करण्यात आल्याने जगभरातले लोक याला भेट देत असून स्टॅच्यु ऑफ युनिटी आणि सरदार सरोवर धरणाचे सौंदर्यही अनुभवत आहेत. देवेगौडा यांनी स्टॅच्यु ऑफ युनिटीला भेट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar