Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्त्रीशक्ती पुरस्कार आणि नारी शक्ती पुरस्कार 2014 च्या सन्मानमूर्तींशी पंतप्रधानांचा संवाद


s2015030862837 [ PM India 228KB ]

s2015030862838 [ PM India 166KB ]

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्ष 2014 च्या स्त्री शक्ती पुरस्कार आणि नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी पुरस्कारप्राप्त महिलांनी आपली स्फूर्तीस्थाने आणि आपले अनुभव कथन केले. प्रधानमंत्री जन धन योजना तसंच नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातल्या निवृत्ती वेतन योजनेसह केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी जागृती करावी असं आवाहन पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांना केलं. या योजना महिलांसाठी लाभदायक ठरणार असून गरजूंपर्यंत योजनांचे लाभ पोहचविण्यासाठी समाज महत्त्वाची भूमिका बजावू शकेल, असं पंतप्रधान म्हणाले.

महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.