Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘स्वच्छता ही सेवा ‘ साठी मान्यवर व्यक्ती आणि समूहांनी दिलेल्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.


स्वच्छता ही सेवा ‘ साठी मान्यवर व्यक्ती आणि समूहांनी दिलेल्या योगदानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली.15 सप्टेंबर रोजी स्वच्छता ही सेवा हे देशव्यापी स्वच्छता अभियान सुरु झाले आणि आज 2 ऑक्टोबर रोजीगांधी जयंती दिनीजो स्वच्छ भारत दिन म्हणून देखील साजरा केला जातोत्याचा समारोप झाला.

ट्विटरवरील संदेशांमध्ये पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानासाठी प्रयत्न आणि पाठिंबा दर्शवल्याबद्दल अनुपम खेरचंदा कोच्चरइंडिया टुडे समूहइंडिया टीव्ही न्यूजसदगुरु जग्गी वासुदेवभारतीय क्रिकेट संघराजीव चंद्रशेखरडेटॉल इंडियाएनडीटीव्हीरिलायन्स फाऊंडेशनटाटा ट्रस्टसअक्षय कुमार आणि श्री श्री रवी शंकर यांची प्रशंसा केली. 

पंतप्रधान ट्विटरवर म्हणतात,

“प्रशंसनीय कार्यअनुपमजी”

प्रसिद्ध अभिनेते @मोहनलाल  यांच्याकडून उत्तम प्रयत्न.

@CKforCleanIndia यांचा महत्वाचा संदेशत्यांनी @ICICIBank परिवारासह स्वच्छ भारत अभियानासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

स्वच्छतेबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी @IndiaTodayपरिवाराने केलेल्या अनुकूल उपाययोजनांबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो. सर्व  #Safaigiri awardees. पुरस्कार विजेत्यांचे मी अभिनंदन करतो.

 @indiatvnewsचा स्तुत्य उपक्रम. यामुळे देशभरात स्वच्छतेच्या संदेशाचा प्रसार होईल.

 आपल्या नद्या स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृतीसाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न केल्याबाबदल मी @SadhguruJV आणि ईशा फाऊंडेशनच्या चमूचे अभिनंदन करतो.

 भारताला स्वच्छ बनवण्याबाबत भारतीय क्रिकेट संघाकडून प्रशंसनीय संदेश

 छान प्रयत्न राजीवजी.

 @DettolIndia आणि  @ndtv यांनी पुढाकार घेतल्याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो. https://twitter.com/swachhindia. यावर

 स्वच्छतेबाबत अनेक प्रेरणादायी प्रयत्न.

 @ril_foundation कडून स्वच्छ भारतासाठी देशभरात प्रशंसनीय कार्य. https://twitter.com/ril_foundation/ ला भेट द्या.

 अभिनंदन @tatatrusts!  स्वच्छ भारत अभियानाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तरुण व्यावसायिकाचा त्यांचा प्रेरक उपक्रम कौतुकास्पद आहे.

 छान लिहिलंय @akshaykumar. स्वच्छ भारत अभियानाला तुमचा पाठिंबा कौतुकास्पद आहे.

 आर्ट ऑफ लिविंग परिवार आणि तुमचा उत्तम प्रयत्न ! 125 कोटी भारतीय एकत्रितपणे स्वच्छ भारत निर्माण करतील. “

 

S.Tupe/S.Kane/Anagha