Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देणारा आणि 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्याचा संकल्प अधोरेखित करणारा उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक


नवी दिल्‍ली, 15 ऑगस्‍ट 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी लिहिलेला लेख सामायिक केला आहे. 

पंतप्रधानांनी म्हटले की, भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करत असताना, या लेखातून माननीय उपराष्ट्रपतींच्या अंदमान आणि निकोबार बेटांच्या दौऱ्याच्या आठवणींना उजाळा मिळतो. तसेच, अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला समर्पित करावे आणि राष्ट्राच्या प्रगती व समृद्धीसाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहनही या लेखातून करण्यात आले आहे.

पंतप्रधानांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले:

“भारत आपला 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना, माननीय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी अंदमान आणि निकोबार बेटांना दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्यांनी देशभरातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केले आहे.

या अमृत काळात 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःला समर्पित करावे आणि राष्ट्राच्या प्रगती व समृद्धीसाठी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.”

 

* * *

शैलेश पाटील/वैभवी जोशी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai