Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्र सज्ज


भारत देश उद्या 70वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेसात वाजता लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशप्रेम जागृत करणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहेत.

मध्य प्रदेशातील चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावापासून सुरु होणाऱ्या तिरंगा यात्रेला 9 ऑगस्ट 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. जनतेमधे देशप्रेम दृढ करणे हा या यात्रेचा उद्देश आहे. ही तिरंगा यात्रा 23 ऑगस्टपर्यंत सुरु रहाणार असून, स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित 150 ठिकाणांना 75 मंत्री भेट देणार आहे. याशिवाय सात महिला मंत्री देशांच्या सीमेवर आपले रक्षण करत असलेल्या सैनिकांना राखी बांधणार आहेत.

केंद्रातील सांस्कृतिक विभागातर्फे नवी दिल्लीतील राजपथ हिरवळीवर साप्ताहिक भारत पर्वचे आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची भावना जागृत करणे, देशाच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देणे, मोठ्या प्रमाणावरील जनसहभाग हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री वैंकय्या नायडू आणि सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री महेश शर्मा यांच्या उपस्थितीत 12 ऑगस्टच्या संध्याकाळी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजपथ हिरवळीवर भारत पर्वचे उद्‌घाटन केले. हा विनामूल्य कार्यक्रम जनतेसाठी खुला आहे. लष्करी दलाच्या पथकांचे सादरीकरण, 50 स्टॉलची खाद्यपान सेवा, हस्तकला मेळा, संकल्पनेवर आधारीत तंबू, विविध राज्य प्रादेशिक संघटना, सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनांचे सांस्कृतिक कार्यक्रम ही या “भारत पर्व” कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने “आझादी 70 साल – याद करो कुर्बानी” या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा स्वातंत्र्यादिनाचा उत्साह लोकांच्या मनात जागृत व्हावा, यासाठी विविध उपक्रमही हाती घेण्यात आले आहे. नवी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे 12 ऑगस्टपासून आठवडाभर स्वातंत्र्यदिन चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी “तिरंगा यात्रा” या गाण्याचेही उद्‌घाटन करण्यात आले. याशिवाय प्रथमच रविंद्रनाथ टागोर, बंकीम चंद्र चटर्जी, मोहम्मद इक्बाल, कवी प्रदीप, शकीलबदयुनी, नौशाद, पितांबर दास या देशभक्तीपर गीतांच्या रचनाकारांचे आत्मचरित्र तसेच आचार्य अत्रे (1972) यांचे तेलगु भाषेतील भारत माता कु जय जेजेलु अशी प्रादेशिक भाषेतील गाणी सादर करण्यात आली. याशिवाय प्रथमच स्वातंत्र्यदिन उत्सवावर आधारीत वेबपेज सुरु करण्यात आले असून, यामधे पंतप्रधानांच्या भाषणाव्यतिरिक्त प्रसिद्धीपत्रक, विशेष लेख तसेच निवडक वीर पुरुषांवरील छायाचित्र, ध्वनिचित्रफीत, सोशल मिडिया लिंक, समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मिडिया व्यासपीठांची मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे.

देशातील सर्व महत्त्वाची स्मारके तिरंग्याच्या रंगानी उजळवण्यात आली आहेत. स्वातंत्र्य लढ्यावर आधारीत व्याख्यान देण्यासाठी संस्थांच्यावतीने तज्ज्ञ वक्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आपापल्या शहर / गावातील स्मारकांना भेटी देण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच 23 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता एकूण 15 लाख शाळा आणि 40 हजार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय गीत गायले जाणार आहे. सर्व शाळा आणि महाविद्यालयात क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला, देशभक्तीपर गीतगायन आदी स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत.

‘स्वातंत्र्याचे रंग’ ही अनोखी मोहीमही 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान होत आहे. राष्ट्र लढ्यातील 70 शहरांमधे ती राबवण्यात येणार आहे. 18 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी प्रथमच महिला मंत्री देशाच्या सीमेवर रक्षण करण्यासाठी तैनात असलेल्या जवानांनी राखी बांधणार आहेत. यासाठी पूर्व भागातील तेंगा, बैसाखी तर उत्तर भागातील बारामुल्ला आणि कुपवाडा ही 4 ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या शूर जवानांचे स्मरण करण्याचा हा दिन आहे. देशभक्तीच्या भावनेसह उत्साहपूर्णतेने असलेल्या लोकांच्या सहभागाने स्वातंत्र्यदिनाचा हा उत्सव लोकांचा उत्सव झाला आहे. यामुळे भविष्यातही देशभक्तीची भावना बळकट होण्यास मदत मिळणार आहे.

N. Sapre/S. Tupe/ D. Rane