Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

स्वामी विवेकानंद यांच्या निर्वाणदिनी पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या निर्वाणदिनी त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान म्हणतात- भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, आध्यात्मिक परंपरा, आणि राष्ट्रचेतना जगासमोर आणण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी दिलेले योगदान अतुलनीय असून, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळणार आहे. त्यांची प्रगाढ बुद्धिमत्ता आणि त्यांनी निर्माण केलेले कालातीत आदर्श- हे देशातील कोट्यवधी तरुणांना दिशा देणारे बळ आहे. “विकसित भारताच्या उभारणीसाठी देशाच्या सामूहिक निर्धाराला स्फूर्ती आणि ऊर्जा देण्याचे कार्य त्यांचा आध्यात्मिक संदेश सातत्याने करत राहील”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

एक्स वरील संदेशात पंतप्रधान म्हणतात-
“स्वामी विवेकानंद यांच्या निर्वाणदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रचेतनेला वैश्विक ओळख मिळवून देण्यात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांची बौद्धिकता आणि प्रेरणादायी विचार आजही कोट्यवधी तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. विकसित भारताच्या निर्मितीचा संकल्प साकारण्यात त्यांचा आध्यात्मिक संदेश देशाला नवी ऊर्जा आणि दिशा देत राहील.”

***

शैलेश पाटील/जाई वैशंपायन/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai