Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हवामान अंदाजासंदर्भातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता


16 डिसेंबर 2016 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत, ब्रिटनचे हवामान कार्यालय (यूकेएमओ), कोरिया हवामान शास्त्र प्रशासन (केएमए) आणि ऑस्ट्रेलियन संघराज्‍याच्या हवामान शास्त्र विभाग व वैज्ञानिक उद्योग आणि संशोधन संघटनांसोबत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या पृथ्वी विज्ञान संघटनेला मंडळस्तरीय करारावर स्वाक्षऱ्या करायला मान्यता दिली आहे. या करारामुळे हवामानाचा दैनंदिन व ऋतूमानानुसार अंदाज बांधण्यासाठी पृथ्वी प्रणाली एकीकृत आराखडयाचा विकास करण्यासाठी सहकार्य लाभेल.

पृथ्वी विज्ञान मंत्रालय एकीकृत आराखडा मंडळासाठी शंभर हजार पौंडचे वार्षिक सदस्यता शुल्क भरणार आहे. जानेवारी 2016 मध्ये या करारावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे. या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर भारत हा एकीकृत आराखडा मंडळातील चौथा भागीदार होईल.

हा सामंजस्य करार मुख्यत: भारतीय हवामान क्षेत्रातील हवामान अंदाजासाठी पृथ्वी प्रणाली आराखडयाच्या विकासासाठी वैज्ञानिक स्रोत तसेच ज्ञानाचे देवाणघेवाण करण्याची परवानगी प्रदान करेल.

या सामंजस्य कराराचा फायदा भारतीय वैज्ञानिक व शैक्षणिक समुदायाला होईल.
पृथ्वी या सामंजस्य करारामुळे पृथ्वी प्रणाली आराखडा आणि हवामान अंदाज या क्षेत्रातील वैज्ञानिक आव्हानांवर एकत्रित काम करुन उपाययोजना शोधणे शक्य होईल ज्याचा लाभ भारतीय वैज्ञानिक व शैक्षणिक समुदायाला होईल.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai