Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय विभागाचे (एस ए आर) मुख्य अधिकारी सी.वाय. ल्युंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

हाँगकाँगच्या विशेष प्रशासकीय विभागाचे (एस ए आर) मुख्य अधिकारी सी.वाय. ल्युंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली


हाँगकाँग एसएआरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी सी.वाय. ल्युंग यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

प्रथमच अधिकृत भारत भेटीवर आलेल्या ल्युंग यांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. ल्युंग यांच्या भेटीमुळे भारत आणि हाँगकाँग दरम्यान व्यापार, गुंतवणूक आणि पर्यटनाला चालना मिळेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

हाँगस्थित कंपन्यांना भारताबद्दल वाटत असलेल्या स्वारस्याबद्दल सी.वाय ल्युंग यांनी पंतप्रधान मोदींना माहिती दिली.

आर्थिक सेवा क्षेत्रासह द्विपक्षीय आर्थिक सहकार्य, तसेच शिक्षण क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सी.वाय. ल्युंग यांनी सहमती दर्शवली.

J. Patankar / S. Tupe / M. Desai