Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हिंदुस्तान व्हेजिटेबल ऑईल कॉर्पोरेशनची भू-संपदा गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाकडे हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता


हिंदुस्तान व्हेजिटेबल ऑईल कॉर्पोरेशनच्या मालकीच्या भू-संपदेचा योग्य वापर किंवा विनियोग करण्यासाठी ती गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाकडे अथवा त्याच्या अधिकृत एजन्सीकडे हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

हिंदुस्तान व्हेजिटेबल ऑईल कॉर्पोरेशनची भू-संपदा हस्तांतरीत करण्याच्या बदल्यात या कॉर्पोरेशनची सरकारप्रती देणी आणि त्याचे व्याज रद्दबातल ठरवण्यात येईल.विविध न्यायालये, न्यायाधिकरणे, प्राधिकरणात प्रलंबित असलेल्या आणि भविष्यात उदभवणारी देणीही सरकारने लक्षात घेतली आहेत.

सात शहरात असलेली जमीन अनेक वर्षे वापराशिवाय पडून राहिली आहे. ही मालमत्ता गृहनिर्माण आणि नागरी विकास मंत्रालयाकडे हस्तांतरित केल्याने सार्वजनिक कामासाठी ती जमीन उपयोगात आणता येईल. यामुळे हिंदुस्तान व्हेजिटेबल ऑईल कॉर्पोरेशन हा आजारी असलेला आणि अवसायनात निघालेला सार्वजनिक उपक्रम लवकर बंद करता येणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha