पीएम्इंडिया
महाराष्ट्रात पुणे येथील हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेडच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त आणि रिक्त जमिनीची अंशत: विक्री करायला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.
या प्रस्तावानुसार हिंदुस्थान अँटीबायोटिक्स लिमिटेडच्या मालकीच्या 87.70 एकर इतक्या अतिरिक्त आणि रिक्त जमिनीची अंशत: विक्री केली जाणार आहे. 821.17 कोटी रुपये रकमेच्या प्राप्तीसाठी ही विक्री केली जाणार आहे. तसेच 100 कोटी रुपये तत्काळ कर्जालाही मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.
B.Gokhale/M.Pange/Anagha