पीएम्इंडिया
नवी दिल्ली: 25 जानेवारी 2026
हिमाचल प्रदेशच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
हिमाचल प्रदेश हा निसर्ग आणि संस्कृतीचा अनोखा संगम असल्याचे म्हणत, पंतप्रधानांनी राज्यातील जनतेच्या उल्लेखनीय प्रतिभेचे आणि पराक्रमाचे कौतुक करताना ते नेहमीच भारतमातेच्या सेवेसाठी समर्पित राहत असल्याचेही नमूद केले आहे.
पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त करत देवभूमीला निरंतर समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान एक्स समाजमाध्यमावरील संदेशात म्हणतात;
“निसर्ग आणि संस्कृती यांचा संगम असलेल्या हिमाचल प्रदेशातील आपल्या परिवारातील सर्वांना राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनाच्या अनेकानेक शुभेच्छा. आपली अद्भुत प्रतिभा आणि पराक्रमाने नेहेमीच भारतमातेची सेवा करत आले आहेत. मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासोबतच या देवभूमीच्या भरभराटीची सदिच्छा व्यक्त करतो.”
प्रकृति और संस्कृति की संगमस्थली हिमाचल प्रदेश के अपने सभी परिवारजनों को पूर्ण राज्यत्व दिवस की अनेकानेक शुभकामनाएं। अपनी अद्भुत प्रतिभा और पराक्रम से वे सदैव मां भारती की सेवा करते आए हैं। मैं उनके सुनहरे भविष्य के साथ-साथ इस देवभूमि की समृद्धि की कामना करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2026
अंबादास यादव/मंजिरी गानू/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com