Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

हुन्नर हाटला पंतप्रधानांची भेट


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हुन्नर हाटला भेट दिली. त्यांनी देशभरातून हुन्नर हाट मध्ये सहभागी झालेल्या उत्कृष्ट कलाकार, क्राफ्टस्मेन आणि पाककृती तज्ञ यांची भेट घेतली. यावर्षी इंडिया गेट लॉन्स वर जवळपास 250 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. सहभाग्यांपैकी 50 टक्के कलाकार या महिला आहेत. पंतप्रधानांनी या कलाकारांशी संवाद साधला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमालाही त्यांनी उपस्थिती लावली .

‘हुन्नर हाट’ चे प्रदर्शन म्हणजे सरकारने त्यांच्या वचन बद्धतेची केलेली पूर्तता आहे. या हाटद्वारे भारतीय कलांचे जतन आणि विस्मृतीत जाणाऱ्या कलांच्या पुनरुज्जीवनाला दिलेला हातभार आहे ‌

यावर्षीच्या ‘हुन्नर हाट’ ची संकल्पना ‘ कुशल को काम’ ही असून, याद्वारे जवळपास तीन लाख पाककला तज्ञ, हस्त कलाकार यांना गेल्या तीन वर्षात रोजगार पुरवण्यात आला आहे.

B.Gokhale/P.Kor