पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ‘श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स’च्या (एसआरसीसी) शताब्दी सोहळ्यात सहभागी होतील. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील.
दिल्ली विद्यापीठाचे ‘श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स’ हे भारतातील उच्च शिक्षणाच्या अग्रगण्य संस्थांपैकी एक असून, वाणिज्य, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या क्षेत्रातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र आहे. ख्यातनाम उद्योगपती आणि दानशूर सर श्री राम यांनी 1926 मध्ये या महाविद्यालयाची स्थापना केली. तेव्हापासून गेल्या शतकाभरात या महाविद्यालयाने विद्वान, व्यावसायिक, प्रशासक, उद्योजक, धोरणकर्ते आणि राष्ट्र-निर्मात्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या.
शताब्दी सोहळा ‘शिक्षक दिना’च्या निमित्ताने होत असल्याने या प्रसंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण पिढ्या घडवण्यात आणि समाजाचा पाया बळकट करण्यात शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांनी दिलेल्या योगदानाचा देश या दिवशी गौरव करतो
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai