Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

१२५ व्या स्वामी विवेकानंद शिकागो भाषण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी पूर्ती निमित्त आयोजित समारंभात पंतप्रधानांचे विद्यार्थ्यांना संबोधन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” तरुण भारत- नवं भारत’ या संकल्पनेवर आधारित, १२५ व्या स्वामी विवेकानंद शिकागो भाषण आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या शताब्दी पूर्ती निमित्त विद्यार्थी परिषदेला संबोधित केले.

त्यांच्या टीवीट्स अकाउंटच्या मालिकेतून पंतप्रधानांनी सांगितले की, ” मी उद्या ” तरुण भारत- नवं भारत’ या संकल्पनेवर इथे जमलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहे.

ही विद्यार्थी परिषद दिनांक ११ सप्टेंबर ला आयोजित करण्यात आली असून, स्वामी विवेकानंद यांनी १८९३ ला शिकागो येथे दिलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या दिवसाचे साधर्म्य साधण्यात आले आहे.

“ या वर्षी आम्ही स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील एतिहासिक भाषणाला १२५ वर्षे पूर्ण झालीत म्हणून आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची शताब्दी पूर्ती मनवत आहोत”.

“स्वामी विवेकानंद यांना युवा शक्तीवर पूर्ण भरवसा होता. त्यांनी राष्ट्र उभारणीत युवा शक्तीला महत्वाचे स्थान असल्याचे जाणले. त्यांच्या विचारांशी प्रेरित होऊन आम्ही न थकता नवीन भारताच्या पुनर्बांधणीत आणि युवकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्यरत झालो आहोत.”

पी आई बी/ बी. गोखले