Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

01.07.2016 पासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई दिलासा जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकांना महागाई दिलासा जारी करण्यास मंजूरी देण्यात आली. 01.07.2016 पासून 2 टक्के वाढीसह हा लाभ दिला जाणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्विकृत आराखडयानुसार ही वाढ करण्यात आली आहे.

या भत्तेवाढीमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्षी‍ि5,622 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे तर 2016-17 या वर्षात 8 महिन्याच्या अवधीत 3,748 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. केंद्र सरकारच्या सेवेतील 50.68 लाख कर्मचारी आणि 54.24 लाख निवृत्ती वेतनधारकांना या वाढीचा लाभ मिळणार आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha