Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

100 व्या उपग्रग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी केले इस्रोचे अभिनंदन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  100 व्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. 

पीएसएलव्ही च्या आजच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रो आणि तिथल्या शास्त्रज्ञांचे मनापासून अभिनंदन. नवीन वर्षातील या यशामुळे अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रात देशाने घेतलेल्या भरारीचा लाभ आपले नागरीक, शेतकरी, मच्छीमार आदींना होईल. 

100 व्या उपग्रहाचे  प्रक्षेपण इस्रोची दैदिप्यमान सफलता आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्वपूर्ण आहे. 

भारताच्या यशाचा लाभ आपल्या भागीदारांसाठी उपलब्ध आहे. आजच्या प्रक्षेपणातील 31 उपग्रहांपैकी 25 उपग्रह इतर 6 देशांचे आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

 

B.Gokhale/J.Patanakar/Anagha