Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

17व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या प्रांरभी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन


17 व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांचे स्वागत केले. लोकसभेच्या अधिवेशनापूर्वी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या निवेदनात आज लोकसभेच्या निवडणुकांनंतर अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘आपण सर्व नव्या खासदारांचे स्वागत करत आहोत, या नव्या खासदारांसोबत नव्या आशा आणि नवी उमेद तसेच सेवा करण्याचा नवा निश्चय देखील आला आहे’, असे पंतप्रधान म्हणाले.

17 व्या लोकसभेत महिला सदस्यांची संख्या वाढल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. संसदेचे कामकाज सुरळीत चालल्यास जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण केल्या जाऊ शकतात, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी आपल्या निवेदनात संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचे महत्वही अधोरेखित केले. सभागृहाच्या कामकाजात विरोधी पक्षाचे सदस्य सक्रीय सहभाग घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. विरोधकांनी त्यांना मिळालेल्या जागांची चिंता करू नये, असे पंतप्रधान म्हणाले.

‘जेव्हा आपण सभागृहात येतो तेव्हा पक्ष आणि विरोधी पक्ष या गोष्टी विसरुन जायला हव्यात, आपण केवळ निष्पक्ष भावनेने जनहितासाठी काम करायला हवे’ अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

N.Sapre/R.Aghor/P.Kor