पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 17 वर्षाखालील मुलांसाठी 2017 मधे भारतात होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या निर्णयांना मंजूरी देण्यात आली.
या स्पर्धेसाठीची ठिकाणे अशी आहेत – जेएलएन स्टेडियम, नवी दिल्ली / डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई / जेएलएन स्टेडियम, कोची / सॉल्ट लेक स्टेडियम कोलकाता / जेएलएन स्टेडियम, फातोर्डा गोवा / आयजी स्टेडियम, गुवाहाटी.
• ठिकाणांसंदर्भात काही अडचण आल्यास आवश्यक ते बदल करण्याचे अधिकार, क्रीडा खात्याचे सचिव, महासंचालक साई, क्रीडाखात्याचे वित्तीय सल्लागार यांचा समावेश असलेल्या समितीला देण्यात आले आहेत. एआयएफएफ आणि फिफाशी चर्चा करुनच हे बदल करता येतील.
• डिस्प्ले बोर्डासहित इतर बाबींवरचा एकूण खर्च आधी संमत केल्याप्रमाणेच 95 कोटी रुपयांच्या मर्यादेत राहून करता येईल.
• अतिरिक्त निधीची आवश्यकता भासल्यास क्रीडा खातं ही बाब संबंधित विभागाकडे नेईल.
• या स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत आयोजन समिती स्थापन करण्याबाबत क्रीडा त्रालयाला अधिकार देण्यात आले आहेत.
N. Chitale /S.Tupe / M. Desai