Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2001मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

2001मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली


नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2025

भारताच्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी तिचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भावपूर्ण आदरांजली वाहिली.

कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचा त्याग केलेल्या सैनिकांच्या स्मृतींना देश आदरपूर्वक अभिवादन करत आहे. गंभीर संकटाच्या वेळी त्यांनी दाखवलेले धैर्य, त्यांची सतर्कता आणि जबाबदारीची अढळ भावना प्रत्येक नागरिकासाठी कायमच प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहताना, म्हटले आहे.

या संदर्भात एक्स वर लिहिलेल्या संदेशात मोदी म्हणतात:

आज या दिवशी, आपला देश 2001 मध्ये आपल्या संसदेवर झालेल्या भीषण हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्यांचे स्मरण करत आहे. गंभीर संकटाच्याप्रसंगी, त्यांनी दाखवलेले धैर्य, सतर्कता आणि कर्तव्याची अढळ भावना वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल भारत सदैव कृतज्ञ राहील.”

***

नेहा कुलकर्णी/मंजिरी गानू/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai