Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

36व्या आंतरराष्ट्रीय भूशास्त्रीय काँग्रेस सोसायटीच्या स्थापनेला मंत्रिमंडळाची मंजुरी


2020 साली 36व्या आंतरराष्ट्रीय भूशास्त्रीय परिषदेचे आयोजन करण्यासाठी आणि भारतीय उपखंडात भू-विज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सोसायटी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

36वी आंतरराष्ट्रीय भूशास्त्रीय परिषद मार्च 2020 मध्ये दिल्लीत होणार आहे. 2018-19 वर्षा
पर्यंत तयारी पूर्ण करण्यासाठी 52 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

खाण मंत्रालय आणि भूविज्ञान मंत्रालय भारतातील आणि शेजारील देशांमधील विज्ञान अकादमींच्या संयुक्त सहकार्याने ही परिषद आयोजित करणार आहे. या परिषदेला जगभरातून 7 हजारांहून अधिक भूवैज्ञानिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या परिषदेबरोबरच “जिओएक्स्पो-2020” हे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये प्रमुख खाणकाम आणि खनिज शोध कंपन्या सहभागी होण्याची शक्यता आहे. भारताची खनिज क्षमता प्रदर्शनात मांडल्यामुळे या क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची संधी निर्माण होईल.

या कार्यक्रमाचा लाभ संपूर्ण भू-वैज्ञानिक समुदायाला आणि भू-विज्ञानाशी संबंधित सर्व घटक, खनिज शोधकाम, खाणकाम, पर्यावरण व्यवस्थापन, हवामान बदल अभ्यास, नैसर्गिक आपत्तींचे व्यवस्थापन यांना होईल. तसेच देशातील भू-पर्यटनाला चालना मिळू शकेल.

S.Kane/I. Jhala/M.Desai