Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

58 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदके जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय विद्यार्थ्यांचे अभिनंदन


 

58 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये चार सुवर्णपदके पटकावलेल्या भारतीय संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले. या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेतील ही भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. भारताच्या या संघात देवदत्त प्रियदर्शी, हर्षित सिंघल, कबीर छिल्लर आणि संदीप कुची यांचा समावेश होता. या संघाची बुद्धिमत्ता, समर्पण आणि विज्ञानाबद्दल या सर्वांमध्ये असलेल्या ध्यासाचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत आहे. त्यांच्यामुळे असंख्य युवा प्रतिभांना रसायनशास्त्राचा अभ्यास करण्याची आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश:

भारताच्या युवा शक्तीने जागतिक पटलावर पुन्हा उमटवला आपला ठसा !

58 व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदके जिंकल्याबद्दल देवदत्त प्रियदर्शी, हर्षित सिंघल, कबीर छिल्लर आणि संदीप कुची यांचा समावेश असलेल्या आपल्या संघाचे अभिनंदन. या प्रतिष्ठित मंचावरील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

या सगळ्यांची बुद्धिमत्ता, समर्पण आणि विज्ञानाप्रती असलेल्या ध्यासाचा संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटत आहे. त्यांच्यामुळे असंख्य युवा प्रतिभांना रसायनशास्त्राचा अभ्यास करण्याची आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणाही मिळेल.

***

माधुरी पांगे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai