Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

चंदिगड येथील भारतीय संस्था व जल संवर्धन संशोधन केंद्राकडील 13111.55 चौरस मीटर जमीन हरियाणा शहर विकास प्राधिकरणाला हस्तांतरित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतपधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने चंदिगड येथील भारतीय मृदा संस्था व जल संवर्धन (आयआयएसडब्ल्यूसी) संशोधन केंद्राकडील जमीन पंचकुला येथील मनसा देवी कॉम्पलेक्स मध्ये 60 मीटर पेरिफरल मास्टर रोड बांधण्यासाठी हरियाणा शहर विकास प्राधिकरणाला (हूडा) हस्तांतरित करायला मंजूरी देण्यात आली आहे. जमीन हस्तांतरण खालील प्रकारे केले जाईल.

• आयआयएसडब्ल्यूसी संशोधन केंद्राकडे असलेली 13,290.30 चौरस मीटर जमीन हुडाला जिल्हाधिकारी दरानूसार हस्तांतरित केली जाईल.

• हुडाकडे असलेली 178.75 चौरस मीटर जमीन चंदीगड येथील आयआयएसडब्ल्यूसी संशोधन केंद्राकडे हस्तांतरीत केली जाईल.

• 410 चौरस मीटर जमिनीचे आयआयएसडब्ल्यूसी संशोधन केंद्र आणि हुडा दरम्यान परस्पर हस्तांतरण.

B.Gokhale/S.Mhatre/AK