पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2016
मान्यवर राष्ट्राध्यख शी जिनपिंग, जेकब झुमा,
मायकेल टेम, व्लादिमीर पुतीन आणि ब्रिक्स व्यापारी परिषदेचे मान्यवर सदस्य,
ब्रिक्स व्यापारी परिषदेच्या या बैठकीत तुमचे स्वागत करतांना मला अतिशय आनंद होत आहे आपल्या सदस्य देशांमधील व्यापारी संबंध आणि अर्थव्यवस्थेतील विविधता यांचे संपूर्ण प्रतिबिंब या परिषदेत पहायला मिळते आहे. परस्परांना प्रतिसाद देत समस्यांवर एकत्रित तोडगा काएत, ब्रिक्स परिषदेचा अजेंडा पुढे नेण्यात, त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
मान्यवर आणि मित्रांनो,
सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक आणि वाणिज्यिक संबंध वाढवणे, हा प्रमुख उद्देश ब्रिक्स परिषदेच्या स्थापनेमागे होता. त्यामुळेच तीन वर्षांपूर्वी दरबन येथे जेव्हा या व्यापारी परिषदेची स्थापना झाली, त्यानंतर या परिषदेची उत्तरोत्तर होणारी प्रगती उत्साहवर्धक आहे. ब्रिक्स सदस्य देशांमधील वाणिज्यिक संबंध अधिक वेगाने दृढ व्हावेत, यासाठी आपल्या देशांमधील उद्योग समुदायांचा पाठिंबा महत्त्वाचा आहे. त्यांच्या सहभागामुळे, समाजात संपत्ती आणि मूल्ये निर्माण होतात तांत्रिक संशोधन आणि क्षमतावृध्दी करुन हे उद्योगसमूह आपल्या अर्थव्यवस्थांमध्ये उत्पादन वाढ व रोजगार निर्मिती करतात. त्यांच्या या दृष्टिकोनाचे मी स्वागत करतो. या दृष्टिकोनाशी मी सहमती दर्शवतो.
मान्यवर,
भारतात, गेल्या दोन वर्षात प्रशासन, विशेषत: उद्योगपूरक परिस्थिती निर्माण करण्याकरता, आमच्या सरकारने अनेक मोठया सुधारणा केल्यात, अनेक निर्णय घेतले याचे चांगले परिणाम आता स्पष्ट दिसू लागले आहेत.
अशा कामगिरीचे मानांकन करणाऱ्या जवळपास सर्व जागतिक निर्देशांकाकडे आपण वाटचाल करत आहोत.
भारतीय अर्थव्यवस्थेचे जगातल्याखुल्या अर्थव्यवस्थांपैकी एका अर्थव्यवस्थेत आम्ही रुपांतर केले आहे.
विकास भक्कम असून त्याची गती कायम राखण्यासाठी आम्ही पावले टाकत आहोत.
व्यापारासाठी सुलभता, व्यापारातले अडथळे दूर करणे, कौशल्य विकासाला प्रोत्साहन, उत्पादन पुरवठयाची साखळी निर्माण करणे तसेच पायाभूत सुविधांचा विकास या बाबींना ब्रिक्स व्यापार परिषद प्राधान्य देत आहे याबद्दल मी समाधानी आहे.
ब्रिक्स देशांमध्ये व्यापार वाढावा यासाठीचे परिषदेचे काम आश्वासक आहे.
महोदय,
न्यू डेव्हलपमेंट बँक आता पूर्णत: कार्यान्वित झाली आहे. आपल्या एकत्रित प्रयत्नांची ही यशस्वी फलश्रुती आहे.
न्यू डेव्हलपमेंट बँक आणि व्यवस्थापनाचे, प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन.
स्वच्छ ऊर्जा, हरित आणि शाश्वत पायाभूत सुविधा यांना न्यू डेव्हलपमेंट बँकेचे प्राधान्य आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. संभाव्य आर्थिक प्रकल्प निश्चिती आणि त्यांची अंमलबजावणी यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेबरोबर ब्रिक्स अंमलबजावणीसाठी न्यू डेव्हलपमेंट बँकेबरोबर ब्रिक्स व्यापार परिषदेने काम करावे यासाठी आम्ही प्रोत्साहन देऊ.
दोन दिवसांपूर्वी, भारताने नवी दिल्लीत पहिला ब्रिक्स व्यापार मेळावा भरवला. त्यात आपणा सर्वांनी सहभाग घेतला.
व्यापारविषयक जागृती आणि वाणिज्यिक आदान-प्रदानासाठी अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.
• परस्पर व्यापार दृढ करणे
• व्यापाराच्या संधी वाढविणे
• गुंतवणूकविषयक संबंध निर्माण करणे
• शोध आणि कल्पकतेला प्रोत्साहन देणे आणि
• ब्रिक्सअंतर्गत वाणिज्यिक अडथळे दूर करणे
ही समाईक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ब्रिक्स व्यापारी परिषदेने आमच्यासमवेत कार्य करावे असे सांगून मी समारोप करतो.
B.Gokhale/R.Aghor/N.Chitale/Anagha
Spoke on the rich potential of economic cooperation between BRICS nations at the @BRICS2016 Business Council Meet. https://t.co/3hSDJRDR3p
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2016
Highlighted reforms undertaken by India in last 2 years to make business easier & make India one of the most open economies in the world.
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2016
BRICS Business Council has a key role in strengthening trade & business opportunities, building investment linkages & promoting innovation.
— Narendra Modi (@narendramodi) October 16, 2016