पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भारत आणि डेन्मार्क यांच्यातील जलसंसाधन विकास आणि व्यवस्थापन विषयक सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
या सामंजस्य कराराअंतर्गत सहकार्याच्या ज्या क्षेत्रांना समाविष्ट करण्यात आले आहेत, ती खालीलप्रमाणे आहेत :
अशाप्रकारे, ह्या सामंजस्य करारामुळे जलस्त्रोत विकास आणि व्यवस्थापन क्षेत्रात दोन्ही देशातील सहकार्य वाढेल; आणि सांडपाणी तसेच वाया जाणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी, दोन्ही देशातील अधिकारी, अभ्यासक, जलक्षेत्र आणि उद्योग यांच्यात थेट संपर्क निर्माण होऊन, सहकार्याची व्याप्ती वाढेल.
पार्श्वभूमी :
डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहअध्यक्षतेखाली 28 सप्टेंबर 2020 रोजी भारत आणि डेन्मार्क दरम्यान आभासी शिखर परिषद झाली होती. या परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात, दोन्ही देशांमध्ये हरित धोरणात्मक भागीदारी सुरु करण्याचा प्रस्ताव होता. तसेच, या संयुक्त निवेदनात, इतर गोष्टींबरोबरच, स्मार्ट शहरांसह पर्यावरण/पाणी आणि चक्राकार अर्थव्यवस्था तसेच शाश्वत शहरी विकास या क्षेत्रातील सहकार्याचाही उल्लेख होता.त्यानंतर, 09 ऑक्टोबर 2021 रोजी डेन्मार्कच्या पंतप्रधान, मेटे फ्रेडरिक्सन यांच्या भारत भेटीदरम्यान, हरित धोरणात्मक भागीदारीबद्दलच्या संयुक्त निवेदनाचा पाठपुरावा करत, त्यांनी खालील घोषणा केल्या होत्या. :
त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डेन्मार्क भेटीदरम्यान, 3 मे 2022 रोजी, जलशक्ती मंत्रालय आणि डेन्मार्कचे पर्यावरण मंत्रालय यांच्यात, इरादापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांनी जाहीर केलेल्या या संयुक्त उद्दिष्टप्राप्तीसाठी एक असा व्यापक सामंजस्य करार केला जावा, ज्यातून, ह्या दोन्ही नव्या उपक्रमांची पूर्तता केली जाऊ शकेल, हे उद्दिष्ट मनात ठेवून त्यानुसार इरादापत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या प्रस्तावित सहकार्याचे मुख्य उद्दिष्ट सर्वंकष आणि सुरक्षित दृष्टिकोनातून, पाण्याच्या आजच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी सुरक्षित आणि स्वच्छ जल उपलब्धता सुनिश्चित करणे हे आहे.
या इरादा पत्राचा पुढचा भाग म्हणून, जलशक्ती मंत्र्यांच्या डेन्मार्क भेटीदरम्यान, 12 सप्टेंबर 2022 रोजी जलसंपदा मंत्रालय, आणि डेन्मार्कचे पर्यावरण मंत्रालय यांच्यात हा सामंजस्य करार करण्यात आला.
N.Chitale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai