नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2026
जर्मन प्रजासत्ताकाचे चान्सलर माननीय फ्रेडरिक मर्झ यांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी आला.
दोन्ही नेत्यांनी भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला आणि दोन्ही देशांमधील सहकार्य सातत्याने वाढत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भारत आणि जर्मनी यावर्षी राजनैतिक संबंधांची 75 वर्षे पूर्ण करत आहेत. या पार्श्वभूमीवर, संरक्षण आणि प्रगत तंत्रज्ञानासह महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य अधिक बळकट करण्याच्या कटिबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला. भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारामुळे द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी अनेक नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा केली. जागतिक शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी तसेच नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी एकत्रितपणे आणि जवळून काम करत राहण्यावर त्यांचे एकमत झाले. आजच्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विविध देशांच्या सहभागातून काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सातत्याने सहकार्य करण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Had a productive conversation with Chancellor Friedrich Merz. We reviewed the growing momentum in the India-Germany Strategic Partnership and discussed ways to unlock new opportunities in trade and investment, defence and advanced technologies. India and Germany will also continue to work closely together to address global challenges and promote peace, stability and a rules-based international order. @_FriedrichMerz @bundeskanzler
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2026