Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

2015-16 ते 2017-18 या वर्षासाठी सर्व मुख्य पोर्ट ट्रस्ट आणि डॉक लेबर बोर्डच्या कर्मचारी आणि कामगारांसाठी नवीन उत्पादनाधारित पारितोषिक योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2015-16 ते 2017-18 या वर्षासाठी सर्व मुख्य पोर्ट ट्रस्ट आणि डॉक लेबर बोर्डच्या कर्मचारी आणि कामगारांसाठी नवीन उत्पादनाधारित पारितोषिक योजनेला आज मंजूरी देण्यात आली.

2015-16 ते 2017-18 या अवधी दरम्यान ही योजना लागू राहणार असून देशभरातील महत्वाच्या पोर्ट ट्रस्टच्या 37, 870 पोर्ट आणि डॉकच्या कामगार-कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 49.58 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

हे उत्पादनाधारित पारितोषिक वार्षिक तत्वावर दिले जाणार आहे. 2014-15 वर्षासाठी 41,492 पोर्ट आणि डॉकच्या कामगार-कर्मचाऱ्यांना या पारितोषिकापोटी 25.93 कोटी रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आली.

या नव्या योजनेमुळे औद्योगिक संबंध सुधारण्याबरोबरच उत्पादकतेला चालना मिळून बंदर क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.

B.Gokhale/M.Pange/Anagha