Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

‘विकसित भारत @ 2047: तरुणाईचा आवाज’ या उपक्रमात सहभागी होण्याचे पंतप्रधानांचे आवाहन


विकसित भारताच्या उभारणीसाठी आपल्या तरुणांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने  ‘विकसित  भारत @ 2047: तरुणाईचा  आवाज’ या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले आहे. विकसित भारताचे आपले  स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी भारताच्या युवा शक्तीवर आपला प्रचंड विश्वास असल्याचे मोदी  यांनी सांगितले. आज सकाळी 10.30 वाजता ते या उपक्रमाला संबोधित करतील.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“विकसित  भारताचे आपले स्वप्न साकार करण्यासाठी माझा भारताच्या युवा शक्तीवर प्रचंड विश्वास आहे. , विकसित भारताच्या निर्मितीसाठी आपल्या तरुणांना एकत्रित आणण्याच्या  उद्देशाने ‘विकसित भारत @ 2047 : तरुणाईचा  आवाज’  या उपक्रमाला आज सकाळी 10:30 वाजता संबोधित करणार आहे.मी तुम्हा सर्वांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करतो.”

***

Jaydevi PS/SBC/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai