Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पुरुषांच्या उंच उडीत कांस्यपदक जिंकणारा ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


सध्या सुरु असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात  कांस्यपदक जिंकल्याबद्दल ॲथलीट मरियप्पन थंगावेलूचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आज अभिनंदन केले.
पॅरालिम्पिकच्या सलग तीन स्पर्धांमध्ये विजयाची मालिका कायम राखणाऱ्या मरियप्पनचे सातत्य आणि कौशल्य याची मोदी यांनी  प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले:
“पुरुषांच्या उंच उडी T63 प्रकारात  कांस्यपदक जिंकल्याबद्दल मरियप्पन थंगावेलूचे अभिनंदन. पॅरालिम्पिकच्या सलग तीन स्पर्धांमध्ये  त्याने पदके जिंकली हे कौतुकास्पद आहे. त्याचे कौशल्य, सातत्य आणि दृढ निर्धार वाखाणण्याजोगा  आहे. #Cheer4Bharat”

***

JPS/SK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai