Search

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन


नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी अभिनंदन केले. पंतप्रधान  मोदी म्हणाले की, आम्ही परस्परांना  लाभदायक आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्रित काम करू.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर पोस्ट केले;

“माझे प्रिय मित्र राष्ट्राध्‍यक्ष @realDonaldTrump @POTUS यांच्याशी  संवाद साधताना आनंद वाटला. त्यांच्या ऐतिहासिक दुसऱ्या कार्यकाळासाठी त्यांचे अभिनंदन केले. आम्ही परस्पर हित आणि विश्वासार्ह भागीदारीसाठी वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या लोकांच्या कल्याणासाठी तसेच जागतिक शांतता, समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी एकत्रित  काम करू.”

* * *

N.Chitale/S.Bedekar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai