नवी दिल्ली – दि. 30 मे, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कानपूर येथे सुमारे 47,600 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे 24 एप्रिल 2025 रोजीचा पूर्वनियोजित कानपूरचा दौरा रद्द करावा लागला होता. या अमानुष कृत्याचे बळी ठरलेले कानपूरचे सुपुत्र शुभम द्विवेदी यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. देशभरातील भगिनी आणि कन्यांच्या वेदना, दुःख, राग आणि सामूहिक रोष यांनी आपण अंतर्मुख झाल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूर सुरू होताच, हा सामूहिक रोष जगभरात उमटला. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानी सैन्याला संघर्ष संपवण्याची विनंती करण्यास भाग पाडण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचे यश त्यांनी अधोरेखित केले. स्वातंत्र्यलढ्याच्या भूमीवर सशस्त्र दलांच्या धाडसाला, शौर्याला पंतप्रधानांनी सलाम केला. ऑपरेशन सिंदूर दरम्यान दयेची याचना करणाऱ्या शत्रूने कोणत्याही भ्रमात राहू नये, कारण ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, असा त्यांनी ठामपणे सांगितले. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताची तीन तत्वे असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. पहिले म्हणजे, प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला भारत निर्णायक प्रत्युत्तर देईल. या प्रत्युत्तराची वेळ, पद्धत आणि अटी केवळ भारतीय सशस्त्र दलच ठरवतील. दुसरे म्हणजे, भारत आता अण्विक धमक्यांना घाबरणार नाही आणि अशा पध्दतीने दिलेल्या इशाऱ्यांवर आधारित आपले निर्णयही घेणार नाही. तिसरे म्हणजे, भारत दहशतवादाचे सूत्रधार आणि त्यांना आश्रय देणारी सरकारे या दोघांनाही एकाच दृष्टिकोनातून पाहतो – पाहणार आहे. पाकिस्तानच्या राज्यातील आणि राज्याबाहेरील घटकांमधील फरक आता अस्वीकारार्ह असेल. शत्रू कुठेही असला तरी त्याचा बिमोड केला जाईल, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
“ऑपरेशन सिंदूरने भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता आणि ‘मेक इन इंडिया’ची ताकद जगासमोर दाखवली”, असे गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी केला. ब्रह्मोस क्षेपणास्त्रासह भारताच्या स्वदेशी शस्त्रांनी अचूकतेने लक्ष्यांवर मारा केला आणि शत्रूच्या प्रदेशात अगदी आतपर्यंत जावून, त्यांच्या स्थानांचा विनाश घडवला असे सांगताना ही क्षमता आत्मनिर्भर भारत बनल्यामुळे आली आणि भारताच्या वचनबद्धतेचा थेट परिणाम आहे, असे त्यांनी नमूद केले. एक काळ असा होता जेव्हा भारत आपल्या लष्करी आणि संरक्षण गरजांसाठी परदेशी राष्ट्रांवर अवलंबून होता. तथापि, देशाने त्या परिस्थितीत बदल घडवून आणण्यास सुरुवात केली आहे, संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, याकडे मोदींनी लक्ष वेधले. संरक्षणात आत्मनिर्भरता ही केवळ अर्थव्यवस्थेसाठीच महत्त्वाची नाही, तर राष्ट्रीय अभिमान आणि सार्वभौमत्वासाठी देखील आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. भारताला या अवलंबित्वापासून मुक्त करण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत उपक्रम सुरू केला आहे, याचा पुनरुच्चार करून मोदींनी संरक्षण स्वयंपूर्णता साध्य करण्यात उत्तर प्रदेशच्या प्रमुख योगदानाबद्दल अभिमान व्यक्त केला. कानपूरच्या ऐतिहासिक आयुध -शस्त्रास्त्र कारखान्याप्रमाणेच, सात आयुध कारखाने प्रगत संरक्षण उत्पादन युनिटमध्ये रूपांतरित झाले आहेत, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशात एका प्रमुख संरक्षण कॉरिडॉरच्या स्थापनेवरही प्रकाश टाकला, ज्यामध्ये कानपूर संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर भारताचे एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहे.
पारंपरिक उद्योग एकेकाळी स्थलांतरित होत असताना, संरक्षण क्षेत्रातील प्रमुख कंपन्या आता त्यांचे अस्तित्व प्रस्थापित करत आहेत हे नमूद करताना अमेठीमध्ये एके-203 रायफल्सचे उत्पादन आधीच सुरू झाले आहे, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.
ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे आता उत्तर प्रदेश हे एक नवीन घर बनले आहे, जे संरक्षण उत्पादनात राज्याच्या वाढत्या महत्त्वाचे प्रतीक आहे यावर त्यांनी भर दिला. भविष्यात कानपूर आणि उत्तर प्रदेश प्रमुख संरक्षण निर्यातदार बनण्याच्या भारताच्या प्रवासाचे नेतृत्व करतील असे पंतप्रधानांनी नमूद केले. नवीन कारखाने स्थापन होतील, लक्षणीय गुंतवणूक होईल आणि हजारो स्थानिक तरुणांना उत्कृष्ट रोजगाराच्या संधी मिळतील असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेश आणि कानपूरला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्याला केंद्र आणि राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे, यावर भर देत मोदी म्हणाले की उद्योगांना चालना देऊन आणि कानपूरचे ऐतिहासिक वैभव पुनर्संचयित करून ही प्रगती साध्य केली जाईल. मागील सरकारांनी आधुनिक उद्योगांच्या गरजांकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे कानपूरमधील औद्योगिक अस्तित्व कमी झाले, असे त्यांनी नमूद केले. कुटुंब-केंद्रित सरकारे उदासीन राहिली, परिणामी केवळ कानपूरच नाही तर संपूर्ण उत्तर प्रदेश विकासात मागे पडला याकडे त्यांनी लक्ष वेधले.
शाश्वत वीज पुरवठा सुनिश्चित करणारी ऊर्जा क्षेत्रातील स्वयंपूर्णता आणि भक्कम पायाभूत सुविधा आणि दळणवळण-संपर्क सुविधा हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक दोन आधारस्तंभ आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. 660 मेगावॅटचा पनकी वीज निर्मिती प्रकल्प , 660 मेगावॅटचा नेवेली वीज निर्मिती प्रकल्प, 1320 मेगावॅट वीज निर्मिती करणारा जवाहरपूर प्रकल्प , 660 मेगावॅट ओब्रा-सी वीज निर्मिती प्रकल्प आणि 660 मेगावॅट खुर्जा वीज निर्मिती प्रकल्प सह अनेक प्रमुख वीज निर्मिती प्रकल्पांचे उद्घाटन केल्याचे त्यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, हे प्रकल्प उत्तर प्रदेशच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहेत.
हे वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर राज्यात विजेची उपलब्धता वाढेल आणि औद्योगिक विकासाला आणखी गती मिळेल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, आज 47,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि विविध उपक्रमांची पायाभरणी करण्यात आली आहे, ज्यातून प्रगतीबद्दल वचनबद्धता आणखी दृढ झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आयुष्मान वय वंदना कार्ड वितरित करण्यात आली, तर इतर लाभार्थ्यांना विविध कल्याणकारी योजनांद्वारे मदत मिळाली आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले. हे उपक्रम आणि विकास प्रकल्प यामधून कानपूर आणि उत्तर प्रदेशच्या प्रगतीसाठी सरकारचे अतूट समर्पण प्रतिबिंबित होते असे त्यांनी अधोरेखित केले.
केंद्र आणि राज्य सरकार आधुनिक आणि विकसित उत्तर प्रदेशच्या निर्मितीसाठी सक्रियपणे काम करत आहेत यावर भर देत, मोदी यांनी अधोरेखित केले की एकेकाळी प्रमुख महानगरांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, सोयी आणि संसाधने आता कानपूरमध्ये दिसू लागली आहेत. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने कानपूरला पहिली मेट्रो सेवा दिली होती याची आठवण करून देत ते म्हणाले की, आज कानपूर मेट्रोची ऑरेंज लाईन कानपूर सेंट्रलपर्यंत पोहोचली आहे. त्यांनी नमूद केले की उन्नत मेट्रो नेटवर्क म्हणून सुरू झालेल्या मेट्रो सेवेचा विस्तार आता भूमिगत देखील झाला आहे, जो शहराच्या प्रमुख भागांना अखंडपणे जोडतो. मोदी म्हणाले की कानपूर मेट्रोचा विस्तार हा एक सामान्य प्रकल्प नाही तर खंबीर नेतृत्व, मजबूत इच्छाशक्ती आणि प्रामाणिक हेतू असलेले सरकार देशाच्या विकासाला कसे चालना देऊ शकते याचा हा दाखला आहे.
प्रचंड गर्दीचा परिसर , अरुंद रस्ते आणि आधुनिक शहरी नियोजनाचा अभाव यामुळे कानपूरमध्ये मेट्रो सेवा किंवा प्रमुख पायाभूत सुविधांमध्ये सुधारणांची अंमलबजावणी करता येईल का याबद्दल लोक साशंक होते. या आव्हानांमुळे कानपूर आणि उत्तर प्रदेशातील अन्य प्रमुख शहरे विकासाच्या शर्यतीत मागे पडली, वाहतूक कोंडी वाढली आणि शहराची प्रगती मंदावली असे त्यांनी नमूद केले.
आज तेच कानपूर आणि उत्तर प्रदेश विकासाचे नवीन मापदंड स्थापित करत आहेत असे त्यांनी नमूद केले. मेट्रो सेवांमुळे कानपूरच्या लोकांना होणारे थेट फायदे मोदी यांनी अधोरेखित केले, कानपुर एक प्रमुख व्यावसायिक केंद्र आहे हे लक्षात घेऊन मेट्रोमुळे व्यापारी आणि ग्राहकांना नवीन बाजारपेठ आणि बडा चौराहा येथे प्रवास करणे सोपे होईल. आयआयटी कानपूरमधील विद्यार्थी आणि सामान्य लोकांचा सेंट्रल रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास वेळ देखील लक्षणीयरीत्या वाचेल यावर त्यांनी भर दिला.
उत्तर प्रदेश, उत्तम प्रदेश बनने की ओर तेजी से अग्रसर है। आज कानपुर में विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास कर अत्यंत प्रसन्न हूं। https://t.co/rMMskyWv0R
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
ऑपरेशन सिंदूर में दुनिया ने भारत के स्वदेशी हथियारों और मेक इन इंडिया की ताकत भी देखी है: PM @narendramodi pic.twitter.com/Ae3V2c7i16
— PMO India (@PMOIndia) May 30, 2025
जो infrastructure, जो सुविधाएं, जो संसाधन बड़ी-बड़ी metro cities में होती हैं… वो सब अब अपने कानपुर में भी दिखने लगी हैं: PM @narendramodi pic.twitter.com/jTSi04j0Bb
— PMO India (@PMOIndia) May 30, 2025
हम यूपी को औद्योगिक संभावनाओं का राज्य बना रहे हैं: PM @narendramodi pic.twitter.com/FC4k8qxxJ6
— PMO India (@PMOIndia) May 30, 2025
***
S.Bedekar/S.Kane/V.Joshi/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
उत्तर प्रदेश, उत्तम प्रदेश बनने की ओर तेजी से अग्रसर है। आज कानपुर में विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास कर अत्यंत प्रसन्न हूं। https://t.co/rMMskyWv0R
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
ऑपरेशन सिंदूर में दुनिया ने भारत के स्वदेशी हथियारों और मेक इन इंडिया की ताकत भी देखी है: PM @narendramodi pic.twitter.com/Ae3V2c7i16
— PMO India (@PMOIndia) May 30, 2025
जो infrastructure, जो सुविधाएं, जो संसाधन बड़ी-बड़ी metro cities में होती हैं… वो सब अब अपने कानपुर में भी दिखने लगी हैं: PM @narendramodi pic.twitter.com/jTSi04j0Bb
— PMO India (@PMOIndia) May 30, 2025
हम यूपी को औद्योगिक संभावनाओं का राज्य बना रहे हैं: PM @narendramodi pic.twitter.com/FC4k8qxxJ6
— PMO India (@PMOIndia) May 30, 2025
स्वतंत्रता संग्राम की पराक्रमी धरती कानपुर से अपनी सेनाओं के शौर्य को सैल्यूट करते हुए, मैं एक बार फिर देश के दुश्मनों को ये आगाह करना चाहता हूं… pic.twitter.com/EvBkbTxbyT
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
उत्तर प्रदेश के लोगों के लिए यह बहुत ही गर्व की बात है कि आज यह राज्य डिफेंस सेक्टर में देश की आत्मनिर्भरता में बड़ी भूमिका निभा रहा है। pic.twitter.com/K8wU4FmoBc
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
ऊर्जा क्षेत्र में आत्मनिर्भरता हो या फिर इंफ्रास्ट्रक्चर और कनेक्टिविटी, डबल इंजन की सरकार उत्तर प्रदेश के तेज विकास के लिए पूरी तरह कमिटेड है। pic.twitter.com/G1SmeUNxN7
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025
हमारे मैन्युफैक्चरिंग मिशन से स्थानीय और लघु उद्योगों को बहुत बढ़ावा मिलने वाला है। इसका एक बड़ा लाभ कानपुर और उत्तर प्रदेश के साथ ही पूरे देश की MSMEs को भी होगा। pic.twitter.com/U5WFZ7AGpf
— Narendra Modi (@narendramodi) May 30, 2025