Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

देशभरामध्ये आज साज-या होत असलेल्या विविध सणांनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा


देशभर आज साजरे होत असलेल्या विविध सणांनिमित्त देशातल्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

व्टिटरच्या माध्यमातून एका शृंखला संदेशाव्दारे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. ‘‘आपण सर्वजण आपल्या पारंपरिक दैनंदिनी, पंचांगानुसार भारतामध्ये विविध सण-उत्सव साजरे करीत आहोत आणि आज नववर्षाचा प्रारंभही होत आहे. उगाडी, गुढी पाडवा, नवरेह आणि साजिबू चेराओबा यानिमित्त सर्वांना माझ्या शुभेच्छा ! या शुभप्रसंगी आपल्या सर्वांना जीवनामध्ये उत्तम आरोग्य, सुख आणि समृद्धी लाभावी.

आपला देश कोविड-19 च्या संकटाशी सामना करीत असताना आपण हे सण साजरे करीत आहोत. सर्वसामान्यपणे आपण ज्या उत्साहात सण साजरे करतो, तसा उत्साह यंदा असणार नाही. मात्र सद्यपरिस्थितीशी दोन हात करण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करण्याचं काम हे सण करतील. कोविड-19 शी लढा देण्यासाठी आपण सर्वजण मिळून काम करूया !!’’ असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor