Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान 30 -31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार


नवी दिल्‍ली, 29 ऑक्‍टोबर 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 30-31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी ते केवडिया मध्ये एकता नगरला भेट देतील, आणि संध्याकाळी 5:30 वाजता एकता नगरमध्ये 280 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता ते आरंभ 6.0 मध्ये 99 व्या सामायिक पायाभूत प्रशिक्षणा अंतर्गत अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7:15 वाजता, पंतप्रधान स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिन समारंभ साजरा होणार आहे.

पंतप्रधान एकता नगरमध्ये विविध पायाभूत आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. पर्यटकांचा अनुभव समृद्ध करणे, सुलभता सुधारणे आणि परिसरातील शाश्वत उपक्रमांना पाठिंबा देणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधान आरंभ 6.0 मध्ये राष्ट्रीय एकता दिनाच्या पूर्वसंध्येला 99 व्या सामायिक पायाभूत प्रशिक्षणा अंतर्गत अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील. “आत्मनिर्भर आणि विकसित भारतासाठी पथदर्शी प्रकल्प” ही या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पनाआहे. भारताच्या 16 नागरी सेवा आणि भूतानच्या 3 नागरी सेवांमधील 653 अधिकारी प्रशिक्षणार्थींचा 99 व्या सामायिक पायाभूत प्रशिक्षण – आरंभ 6.0  मध्ये समावेश आहे.

31 ऑक्टोबर रोजी, पंतप्रधान राष्ट्रीय एकता दिन समारंभात सहभागी होणार आहेत तसेच ते सरदार वल्लभभाई पटेल यांना पुष्पांजली अर्पण करतील. पंतप्रधान एकता दिनाची शपथ घेतील आणि एकता दिन संचलन पाहतील ज्यामध्ये 9 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील पोलिस, 4 केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, राष्ट्रीय छात्र सेना आणि 16 संचलन पथके आणि वाद्यवृंद संचलन पथक असेल. राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या कवायती, सीमा सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या महिला आणि पुरुष मोटरसायकल स्वारांच्या धाडसी कवायती, सीमा सुरक्षा दलातर्फे भारतीय मार्शल आर्ट्सच्या संयोजनाचे संचलन, शाळकरी मुलांचे वाद्यवृंद संचलन पथक, भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्य किरण’ हवाई कसरती इत्यादींचा विशेष आकर्षणांमध्ये समावेश आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संदेश नाईक/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai