Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेझ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला


नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2026

 

व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष  डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेझ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य, शेती आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील संबंध, यासह सर्व क्षेत्रांमध्ये भारत-व्हेनेझुएला भागीदारी आणखी वाढवण्यावर आणि दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान केले आणि ग्लोबल साउथसाठी दोन्ही देशांमधील दृढ सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. परस्परांच्या संपर्कात राहण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

 

* * *

सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai